Widgets Magazine
Widgets Magazine

महाराष्ट्र सरकारला जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टमुळे मिळाले 3.40 कोटी!

रविवार, 14 मे 2017 (09:20 IST)

jastin biber
प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरचा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर १० मे रोजी लाईव्ह कॉन्सर्ट झाला.

या कॉन्सर्टमध्ये त्याने स्वत: गाणी न गाता, केवळ लिप सिंक केल्याने चाहत्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

असे असले तरी दुसरीकडे जस्टिन बिबरच्या या कॉन्सर्टमुळे महाराष्ट्र सरकारला जवळपास 3 कोटी 40 लाख रुपये मिळाले आहेत. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

बिबरच्या कार्यक्रमावरील विविध टॅक्समुळे महाराष्ट्र सरकारला ही रक्कम मिळाली आहे.

दिल्लीतील व्हाईट फॉक्स कंपनीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी अॅडव्हान्स टॅक्स म्हणून 3 कोटी 7 लाख रुपये जमा करुन घेतले होते. त्यावेळी 35 हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यापेक्षा जास्त लोक आल्याने आयोजकांना आणखी 33 लाख भरावे लागतील, असे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांनी 15 लाख रुपये अॅडव्हान्सरुपी घेतले होते.

सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी आम्ही कॉन्स्टेबलसाठी प्रत्येकी 2 हजार रुपये तर अधिकाऱ्यासाठी 2500 रुपये आकारले होते, असे उपायुक्त तुषार दोषी यांनी सांगितले.

“30 अधिकाऱ्यांसह जवळपास 700 पोलीस या कॉन्सर्टसाठी तैनात होते. अजून आम्ही हिशेब केलेला नाही, तो करुन आयोजकांना बिल पाठवून देऊ. एकदा कार्यक्रम झाल्यानंतर पैसे वसूल करणं मोठं जिकीरीचं काम असतं. त्यामुळेच आम्ही अॅडव्हान्स रक्कम घेतो”, असंही त्यांनी सांगितले.
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

बेवॉचच्या आधी बघा प्रियंका चोप्राचा सिझलिंग अवतार

प्रियंका चोप्राचे चाहते तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाची वाट बघत आहे जी दोन जून रोजी ...

news

कतरिना पुन्हा अमिरसोबत करणार ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’

यशराज फिल्म ने पुन्हा यशाचा फार्मुला एकत्र केला आहे. धूम ३ हा सुपर हिट नंतर आता पुन्हा यश ...

news

जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला मलायका आणि अरबाज सोबत

जगप्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबरच्या नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर रंगलेल्या ...

news

स्टेजवर येताच जस्टिन म्हणाला : ‘थँक्स इंडिया… मी पुन्हा येईन..’

सलग दीड तास त्याने परफॉर्म केलं. यावेळी त्याने त्याची गाजलेली २१ गाणी गायली. यात ‘बेबी’, ...

Widgets Magazine