1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2017 (11:37 IST)

बॉडीगार्ड शेराच्या खांद्यावर जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी

justin bibar

पर्पज टूरसाठी भारतात येणाऱ्या जस्टिन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारी, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर सोपवण्यात आली आहे. कॅनडाचा पॉप सिंगर 7 मे रोजी दुबईहून मुंबईला 7 मे रोजी येत आहे. तर 10 मे रोजी त्याचा नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये त्याचा कॉन्सर्ट होणार आहे. शेरा आपल्या टायगर सिक्युरिटीसोबत हे काम करणार आहे. एखाद्या हॉलिवूड सेलिब्रिटीच्या सुरक्षेसाठी शेराची निवड होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी शेरा आणि त्याच्या कंपनीने विल स्मिथ, जॅकी चॅन या अभिनेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली होती. जस्टिन बीबर 120 साथीदारांसह फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दाखल होईल. त्याच्या सेवेसाठी 10 लक्झरी सिडानसह दोन व्होल्वो बस कायम असतील.