शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (12:14 IST)

अमेरिकेमध्ये कंगनाच्या गाडीला अपघात

अमेरिकेमध्ये बॉलीवूडची ‘क्वीन’ अर्थात कंगना रणौतच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातामध्ये कंगना बचावली असून तिच्या डोक्याला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या कंगना अमेरिकेत हंसला मेहता यांच्या ‘सिमरन’ या सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. यावेळी शूटींग संपवून कंगना हॉटेलवर परतत असताना तिच्या गाडीला अपघात झाला. कंगनाची गाडी चालवणाऱ्या चालकाला खोकला आला आणि यादरम्यान त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्या लगतच्या तारेच्या कुंपणावर जाऊन धडकली. अपघातात कंगना आणि तिच्या सहकाऱ्यांना किरकोळ जखम झाली.  पचारांसाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.