इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  अभिनेत्री कंगना राणावत सध्या आपल्या आगामी थलाइवी' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. त्यानंतर आता कंगना आणखी एका पॉलिटिकल ड्रामा चित्रपटात काम करणार आहे. कंगना राणावत या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपट बायोपिक नसल्याची पुष्टीही कंगनाने दिली असून यात अनेक दिग्गज-स्टार कलाकार झळकणार आहेत.
				  													
						
																							
									  
	 
	कंगनाने एका मुलाखतीत सांगितले की, मी या प्रोजेक्टवर सध्या काम करत आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात   असून हा इंदिरा गांधींचा बायोपिक नाही. हा एका ऐतिहासिक घटनेवर आधारित असलेला चित्रपट असणार आहे. या पॉलिटिकल ड्रामातून तरुण पिढीला भारताची सामाजिक-राजनीती समजण्यास मदत मिळणार आहे. या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकारांचा सहभाग असणार असून भारतीय राजकारणातील एका प्रतिष्ठित नेत्याची भूमिका साकारण्यासाठी मी  उत्सुक असल्याचे कंगनाने सांगितले. दरम्यान, हा चित्रपट एका पुस्तकावर आधारित आहे. परंतु तो कोणत्या पुस्तकावर आधारित आहे, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. याची पटकथा साई कबीर यांनी लिहिली आहे.