1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2024 (11:42 IST)

Kangana Ranaut:सुप्रिया श्रीनेतच्या आक्षेपार्ह पोस्टवर महिला आयोगाने केली ही मागणी

kangana ranaut
भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून कंगना कंगना राणौतला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार बनवले आहे. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून चित्रपट कलाकारांसह राजकारण्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी अभिनेत्रीबाबत एक पोस्ट टाकल्याने वाद निर्माण झाला आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्याबद्दल काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी केलेल्या अशोभनीय टिप्पणीची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी एनसीडब्ल्यूने सोमवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुप्रिया श्रीनेट आणि एचएस अहिर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे, ज्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देण्यात आली आहे.
 
 
Edited by - Priya Dixit