Widgets Magazine

गमावण्यासारखं आता माझ्याकडे काहीच नाही-कंगना

मुंबई| Last Modified मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (09:16 IST)
कंगना राणावत हिने तिच्या मुलाखतीतून अनेक कलाकारांवर केलेल्या आरोपामुळे ती चांगलीच वादात सापडली आहे. कंगनाने तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये बरंच नाव कमवलं आणि तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळवले.
सिने इंडस्ट्रीतील अनेकांनी तिच्यावर टीकाही केली आहे. अशात ‘माझं करिअर संपलं तरी, माझ्याकडे आता गमावण्यासारखं काहीच नाही. कारण माझ्याकडे आयुष्यभरातील माझ्या यशाची कहाणी आहे’.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘मी संघर्षाच्या दिवसात माझ्या भीतीवर वर्चस्व मिळवले आणि स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न केला. आता मी माझ्या कामगिरीवर पूर्णपणे संतुष्ट आहे. मी कोणत्याही माहितीशिवाय १५ वर्षांची असताना घर सोडले होते. पण आता ३० वर्षांची झाल्यावर मी माझ्याबाबतीत खूपकाही जाणून आहे’.
ती म्हणाली की, ‘मी तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत आणि मी बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले आहेत. आता मी स्वत:ला ओळखले आहे. इथे माझं करिअर संपलं तरी माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. आयुष्यभरासाठी मी मिळवलेल्या यशाची कहाणी माझ्याकडे आहे’. भीतीबाबत कंगना सांगते की, ‘मला भीती का वाटावी? मी जेव्हा घर सोडलं तेव्हा मला आत्मनिर्भर व्हायचं होतं. आता मी एक मेगास्टार आहे. जर मला भीती वाटली तर मी आयुष्यभर तेच फिल करत राहणार. त्यामुळे संपण्याची मला भीती नाही. मला माझ्या क्षमतांवर विश्वास आहे’. कंगनाने सांगितले की, ‘मी मनालीमध्ये एक सुंदर घर तयार केलं आहे. मला तिथे वेळ घालवायचा आहे. पुस्तक लिहायचं आहे आणि मला एका सिनेमाचं दिग्दर्शन करायचं आहे’.


यावर अधिक वाचा :