1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (09:55 IST)

कंगनाला मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती

Kangana said on Ram Kadam's tweet – Mumbai police fear more than mafia
भाजप नेते राम कदम यांनी, कंगना रणौत बॉलिवूडमधील ड्रग्ज माफीयांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे, त्यासाठी तिला महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली असताना तिने मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय असं उत्तर दिलं आहे.
 
१०० तास, ४ दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्र सरकारने अजून कंगनाला सुरक्षा पुरवलेलेली नाही जेव्हाकि ती बॉलिवुडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे असे आशयाचे ट्विट राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही टॅग करत लिहिले होते. त्यावर आता कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.
 
माझ्या काळजीसाठी धन्यवाद सर, पण खरंतर मला आता मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे. 
 
अभिनेत्री कंगना राणावतचे विधान....महाराष्ट्र सरकारच्या सणसणीत कानाखाली लगावल्या सारखे आहे अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी रिप्लाय देताना दिली आहे.