गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (09:32 IST)

कंगना, राजकुमार राव यांचा आगामी 'जजमेंटल है क्या हा चित्रपट ट्रेलर जबरदस्त

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत, राजकुमार राव यांचा 'मेंटल है क्या' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, मात्यार चित्रपटाच्या नावाला मानसोपचार तज्ञांनी विरोध केला असून, यामुळेच या चित्रपटाचे नाव बदलून आता ट्रेलर रिलीज केला आहे. तर या चित्रपटाचे नविन नाव 'जजमेंटल है क्या' असे ठेवले आहे.
 
'जजमेंटल है क्या' या चित्रपटाचा ट्रेलर १९ जूनला रिलीज होणार होता.मात्र मानसोपचार तज्ञांनी केलेल्या विरोधामुळे निर्मात्यांनी ट्रेलर लॉन्चिंगची तारीख पुढे ढकलली होती.
 
'ट्रस्ट नो वन' या टॅगलाईनवर आधारित 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट असून, चित्रपटाची कथा मर्डर मिस्ट्रीची आहे. या चित्रपटात कंगना 'बॉबी' तर राजकुमार 'केशव'ची मुख्य भूमिका साकारत असून, कंगना बोल्ड अंदाजात तर  राजकुमार एका सामान्य व्यक्तीची भूमिका करतो आहे. कंगना आणि राजकुमार हे एका खुनातील संशयित आरोपी असल्याचे दाखवण्यात आले आहे. 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रोमॉटिक कॉमेडी दिसत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेमालुदी यांनी केले आहे. हा चित्रपट २६ जुलैला रिलीज होणार आहे.