गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2024 (12:32 IST)

आईला कँसर झाला तेव्हा शूटिंग करत होते कार्तिक आर्यन, म्हणाले-सर्व सोडावेसे वाटत होते

कार्तिक आर्यन आपला आगामी चित्रपट चंदू चॅंपियनसाठी एकसाईटेड आहे. या दरम्यान एका इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले की, ही ती वेळ होती जेव्हा माझ्या आईला कँसर झाला होता. कमी लोकांना माहित आहे की, 'सोनू की टिटू की स्वीटी' या चित्रपटाचे शूट सुरु असतांना माझ्या आईला कँसर झाला होता. पण आता ती ठीक आहे. पण माझ्या कुटुंबासाठी ती खूप कठीण वेळ होती. 
 
तसेच कार्तिक आर्यन म्हणाले की, माझ्या आईला जेव्हा कँसर झाला तेव्हा मला समजायचे नाही की मी शूट वर कसे जाऊ, माझे मन तयार व्हायचे नाही. मी त्यावेळेला सर्व सोडून देणार होतो. मला वाटायचे की मी कधी काम करू शकणार नाही. माझ्या आईने मला तेव्हा सल्ला दिला की काम करत राहा. कार्तिकने सांगितले की त्याचे त्याचा आईसोबत खूप जवळचे नाते आहे. 

Edited By- Dhanashri Naik