शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (16:06 IST)

'क्योंकी सासभी कभी बहू थी फेम अभिनेता विकास सेठी यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Vikas Sethi
क्योंकी सास भी कभी बहू थी फेम अभिनेता विकास सेठी यांचे वयाच्या 48 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले.विकास सेठी यांचं जगातून जाणं हे टीव्ही इंडस्ट्री आणि अभिनेत्याच्या कुटुंबाचं मोठं नुकसान आहे.

अभिनेताने आपल्या मागे एक हसतमुख कुटुंब सोडला आहे. अभिनेत्याची पत्नी आणि त्याच्या दोन लहान जुळ्या मुलांसाठी हे खूप कठीण काळ आहेत. विकास सेठी यांच्या निधनाच्या बातमीने टीव्ही जगतासह चाहत्यांनाही हादरवून सोडले आहे. कुटुंबात शोककळा पसरली आहे. 

क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'कहीं तो होगा', 'कसौटी जिंदगी की' सारख्या शोचा भाग असलेला विकास सेठी प्रत्येक घराघरात आपले स्थान निर्माण केले आणि तो प्रसिद्ध झाला.आज सकाळी 8 सप्टेंबर रोजी त्याचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले असून अद्याप कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 
Edited By - Priya Dixit