गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (13:43 IST)

बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याबाबत नीरज चोप्राने मधुर भंडारकरला दिलं हे उत्तर, चाहते जाणून आश्चर्यचकित होतील

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुर्वणपदक मिळाले असून भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वांनीच सोशल मीडिया पोस्टद्वारे नीरजचे कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची भेट घेतली. त्यानंतर त्या दोघांच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याच्या चर्चा रंगल्या.
 
टाईम्सच्या बातमीनुसार मधुर भांडारकर म्हणतात की मी स्वातंत्र्यदिनी दिल्लीत होतो आणि मी अशी व्यक्ती ओळखत होतो ज्यामुळे ही बैठक शक्य होऊ शकेल. मला टोकियो ऑलिम्पिकमधील खेळाडूंना त्यांच्या यशाबद्दल आणि भारताचा अभिमान वाढवण्यासाठी अभिनंदन करायचे होते.
 
मधुरने म्हटले की मी नीरजला सांगितले की तो एक सुपरस्टार बनला आहे आणि आता त्याचे जगभरातून बरेच चाहते आहेत. यानंतर मी विनोदाने त्याला विचारले, तू गुड लुकिंग आहेस, म्हणून तू कधी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचा विचार केलास का? '
 
तर यावर त्याने उत्तर दिले, मला अभिनय करायचा नाही, फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याच्याशी झालेल्या संभाषणातून मला जाणवले की त्याच्याकडे एक चांगला रोडमॅप आहे. त्याने मला सांगितले की त्याला देशासाठी अधिक साध्य करायचे आहे. नीरजाप्रमाणे मीराबाईला भेटून मलाही आनंद झाला, ऑलिम्पिक जिंकल्यानंतर भारताच्या लोकांकडून मिळालेल्या प्रतिसाद आणि प्रेमाने ती भारावून गेली.
 
या वर्षी नीरज चोप्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं आणि मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकल्याने देशाचं मान वाढला आहे. दोन्ही खेळाडूंना देशवासियांकडून खूप प्रेम आणि आदर मिळत आहे. नीरजच्या बायोपिकच्या बातम्या बऱ्याच काळापासून फिरत होत्या. आता हे पाहावे लागेल की नीरजच्या जीवनावर आधारित चित्रपट रसिकांसमोर कधी सादर होतो.