गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2019 (09:27 IST)

बॉलीवूडकडून गाण्यातून शहीदांना श्रद्धांजली अर्पण

Offering tributes
पुलवामा दहशतवादी हल्लात ४० भारतीय वीर जवान शहीद झाले. या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सीआरपीएफने बॉलिवूडमधील काही कलाकारांसह एक गाणं चित्रीत केलं आहे.
 
सीआरपीएफने अभिनेता अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आमिर खान यांच्यासह हे गाणे चित्रीत केले असून ”तू देश मेरा” असे या गाण्याचे शीर्षक आहे. सीआरपीएफने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. सीआरपीएफने शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमधून रणबीर, आमिर आणि अमिताभ यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच तू देश मेरा” या गाण्यामधून पुलवामा हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना हे गाणं समर्पित केल्याचंदेखील म्हटलं आहे.