गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमानसोबत स्क्रीन शेअर करणार प्रभास

बॉक्स ऑफिसवर एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली 2 या चित्रपटाने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. दक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या नावाभोवती असलेल्या चाहत्यांची गर्दी बाहुबली 2 च्या घवघवीत यशानंतर कमालीची वाढली आहे.
 
आता बॉलीवूडमध्ये प्रभास पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. चित्रपट निर्माता करण जोहर प्रभासला बॉलीवूडमध्ये लाँच करणार होता, अशीही चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी होती. प्रभास हा सध्या त्याच्या साहो चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पण तो लवकरच हिंदी चित्रपटातही दिसणार असल्याची चर्चा आहे.
 
सलमान खान आणि प्रभास हे दोन आघाडीचे अभिनेते रोहित शेट्टीच्या अॅक्शन चित्रपटांतून एकत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सलमान आणि प्रभास हे दोन्ही अभिनेते एकाच चित्रपटात स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.