Widgets Magazine

बाहुबली 2 सोबत डबल ट्रीट

Last Modified गुरूवार, 20 एप्रिल 2017 (13:09 IST)

अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली 2 : द कन्क्लूजन’ या

सिनेमासोबतच प्रेक्षकांना आणखी एक ट्रीट मिळणार आहे.
प्रभासच्या पुढच्या अॅक्शन सिनेमाचा टीझर ‘बाहुबली 2’ सोबत रिलीज होणार आहे. प्रभासच्या नव्या सिनेमाचं नाव अजून निश्चित झालेलं नाही. मात्र सिनेमाच्या बजेटचा मोठा हिस्सा अॅक्शन सीनच्या शूटिंगवर खर्च होईल, असं सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत यांचं म्हणणं आहे. सिनेमाचे निर्माते सिनेमातील अॅक्शन सीनवरच तब्बल 35 कोटी रुपये खर्च करणार आहेत. प्रेक्षकांना या सिनेमाचा टीझर ‘बाहुबली 2’ सोबत पाहायला मिळणार आहे. सिनेमाला शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाचं संगीत असेल.यावर अधिक वाचा :