मंगळवार, 16 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रजनीकांतची कमाई ऐकून तुम्ही थक्क व्हाल

rajnikant kamal hassan
तमिळ सुपरस्टार रजनीकांत हा जॅकी चॅन खालोखाल सर्वाधिक मानधन घेणारा आशियाई कलाकार म्हणून ओळखला जातो. रजनीकांत यांच्या प्रत्येक नवीन चित्रपटाचे त्यांच्या नावावर मानधनाचे नवे विक्रम जमा होत असतात. नुकतेच रजनीकांत यांनी नवीन चित्रपट स्वीकारला असून त्याचे मानधन ऐकल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. रजनीकांत आणि बॉलिवूड कलाकार अक्षयकुार यांनी एकत्रित अभिनय केलेला 2.0 हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर रजनीकांत यांनी दिग्दर्शक कार्तिक सुब्बराज यांचा नवीन चित्रपट स्वीकारला असून या चित्रपटासाठी त्यांना तब्बल 65 कोटी रुपये मिळणार आहेत. तमिळनाडूचे ज्येष्ठ नेते ए. करुणानिधी यांच्या नातेवाईकांच्या मालकीच्या सन पिक्चर कंपनीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी चाळीस दिवस राखीव ठेवले असून जून महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. या चित्रपटात तृषा कृष्णन आणि दीपिका पदुकोण या नायिका असतील असे या वृत्तात म्हटले आहे. रजनीकांत हे 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिळ चित्रपटानंतर भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले होते.