testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राखी सावंतच्या विरोधात अटक वॉरंट लागू

rakhi sawant
Last Modified गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (09:06 IST)
राखी सावंतच्या विरोधात पंजाबमधील कोर्टात एक प्रकरण प्रलंबित आहे. त्याच प्रकरणी पंजाबमधील कोर्टाने अलिकडेच राखीचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला आणि तिच्याविरोधात नव्याने अटक वॉरंट लागू केले आहे. कोर्टातल्या सुनावणीला राखी स्वतः उपस्थित न राहिल्यामुळे तिच्याविरोधात हे वॉरंट बजावण्यात आले आहे. राखी सध्या अमेरिकेला गेली असल्याने ती कोर्टात सुनावणीला उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे तिला दिलेल्या जामीनाची मुदत वाढवण्यात यावी, असा अर्ज तिच्या वकिलांनी कोर्टात केला होता. हा अर्ज कोर्टाने अमान्य केला. 7 ऑगस्टला सुनावणीला हजर होईल, या अटीवरच राखीला 5 ऑगस्टला जामीन मंजूर झाला होता. पण तिने आपला शब्द पाळला नाही. राखीने पूर्वी एका टिव्ही चॅनेलवरच्या कार्यक्रमामध्ये बोलताना वाल्मिकी समाजाविरोधात अपशब्द उच्चारले होते. त्याप्रकरणी तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या समाजाच्या नेत्यांनी दिला होता. राखीने या प्रकरणी बिनशर्त माफी मागण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या राखीला धडा शिकवायचाच, असा निर्धार वाल्मिकी समाजाच्या नेत्यांनी केला आहे.


यावर अधिक वाचा :