Widgets Magazine

'रंगून' कायद्याच्या कचाट्यात अडकला

'रंगून' सिनेमा कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकला आहे. वाडिया मु्व्हीटोन कंपनीने 'रंगून'चे निर्माते साजिद नडियाडवाला आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सिनेमात कंगनाच्या व्यक्तिरेषेविषयी कॉपी राइट्सचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या चित्रपटात कंगना , शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्या ‘रंगून’मध्ये मुख्य भूमिका आहेत. हा संपूर्ण वाद कंगना रनौटच्या सिनेमातील 'जुलिया' या व्यक्तिरेखेविषयी आहे. वाडिया मुव्हीटोन कंपनीचा दावा आहे की, रंगून' मधील कंगनाची व्यक्तिरेखा ५० च्या दशकातील चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नाडियावर आधारलेली आहे, जी त्या काळी 'फिअरलेस नाडिया' या नावाने प्रसिद्ध होती. येत्या शुक्रवारी 'रंगून' प्रदर्शित होणार आहे. आता न्यायलयाचा निर्णय जर रंगूनच्या बाजूने नाही लागला तर मात्र विशाल भारद्वाज यांना
कंगनाच्या व्यक्तिरेखेत बदल करणे गरजेचे आहे. किंवा
वाडिया मुव्हिटोन कंपनीला या व्यक्तिरेखेसाठी अधिकृत किंमत द्यावी लागणार आहे.


यावर अधिक वाचा :