शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (13:40 IST)

रेखाच्या सुंदरतेवर चाहते झाले घायाळ, म्हणाले - 'दीपिकाला देखील मात देत आहे'

एवरग्रीन ब्युटी रेखा नेहमी आपले कपडे आणि फॅशनमुळे लाइमलाइटमध्ये राहते. रेखा कुठल्याही इवेंट किंवा पार्टीत गेली की नेहमी तिचे परिधान केलेले कपडे नेहमी तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतो. नेहमी कांजीवरम साडीत दिसणारी रेखा या वेळेस वेगळ्या लुकमध्ये दिसली.  
रेखा नुकतीच फॅशन डिजाइनर मनीष मल्होत्राच्या स्टोअरमध्ये पोहोचली होती. यंदा रेखा ने साडी न नेसता रेशमाचा काफ्तान घातला होता. व्हाईट कलरच्या काफ्तानसोबत तिने मॅचिंग ओढणी घेतली होती. तिचा हा डिफरेंट लुक तिच्या चाहत्यांना फार आवडला असून ते तिची तारीफ करत होते.  
 
एका यूजर ने रेखाची तुलना दीपिका पादुकोणशी करत लिहिले - 'बिलकुल दीपिका पादकुोणसारखी दिसत आहे. '
एका इतर यूजरने रेखाची सुंदरता बघून लिहिले - 'काय ही रेखा आहे ?' तसेच एकाने तिला एवरग्रीन ब्युटी लिहिले तर कोणी डीवा म्हटले.  
नुकतेच गणेश चतुर्थीच्या प्रसंगी अंबानी परिवाराने मुंबई स्थित घर एंटीलियामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या फंक्शनमध्ये रेखा देखील गेली होती. गोल्डन आणि  पर्पल कलरची साडीसोबत रेखाने हेवी ज्वॅलरी केरी केले होते. तिच्या सुंदरतेचे सर्वच घायाळ झाले होते.