शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (15:22 IST)

रिंकू लवकरच वेबसीरिजमध्ये दिसणार

Rinku will be appearing in the webseries soon
'सैराट' चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेतून मराठीसह इतर भाषिकांच्या नावर अधिराज्य केलेल्या रिंकू राजगुरू लवकरच वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. याबाबतची माहिती रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. हिंदी वेबसीरिजमध्ये पदार्पण करत असलेली रिंकू मणिकर्णिका फेम अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 
 
'बेपनाह' आणि 'निशा और उसके कझिन्स'मध्ये दिसलेला अभिनेता ताहिर शब्बीर आता दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हॉटस्टार वर ताहिरची '100' नावाची वेबसीरिज येत असून यामध्ये रिंकू राजगुरू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रिंकू सोबतच या वेबसीरिजमध्ये ताहिर आणि फोर मोअर शॉर्टस्‌ फेम राजीव सिध्दार्थसुद्धा दिसणार आहेत. ताहिर नुकताच नेटफ्लिक्सवरील गिल्टी आणि वूटवरील लॉ अ‍ॅण्ड ऑनर या वेब सीरिजमध्ये दिसला आहे. ताहिरच्या रॅट फिल्म या बॅनर अंतर्गत या वेबसीरिजची निर्मिती होत आहे. 'सैराट'नंतर रिंकूचा 'कागर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.