शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (17:35 IST)

'रुद्रकाल'चे थरारनाट्य लवकरच !

प्रेक्षकांना नवनवीन मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी मिळत असतानाच, आता हॉटस्टार आणि स्टार प्लस प्रेक्षकांसाठी एक धमाका घेऊन येत आहे. दशमी क्रिएशन निर्मित आणि सुकृती त्यागी दिग्दर्शित 'रुद्रकाल' ही रहस्यमय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही कथा आहे एका प्रकरणात अडकलेल्या बंडखोर पोलिसाची आणि त्याच्या कुटुंबाची. या प्रकरणातून बाहेर पडतानाचा त्याचा प्रवास म्हणजे 'रुद्रकाल'.
 
''शहरात दर दिवशी सामोरे जावे लागणाऱ्या तसेच सद्यस्थितीतील विविध समस्यांना यानिमित्ताने स्पर्श करण्यात आला आहे. कायद्यात राहून मालिकेतील पात्र या समस्यांचा कसा सामना करेल, हे 'रुद्रकाल'मध्ये दाखवण्यात आले असल्याचे निर्माता नितीन वैद्य यांनी सांगितले.
 
झळकणार मराठी चेहरे 
डिसेंबरपासून आठवड्याच्या शेवटी प्रसारित होणाऱ्या या थरारनाट्यात भानू उदय, दीपांनीता शर्मा आणि रुद्राक्ष जैस्वाल यांच्या प्रमुख भूमिका असल्या तरी या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे यात काही मराठीतील नावाजलेले चेहरे देखील झळकणार आहेत. या मालिकेत किशोर कदम, श्रुती मराठे आणि स्वानंद किरकिरे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.