शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 11 डिसेंबर 2022 (11:58 IST)

रणबीर कपूरचा चित्रपटात सई पल्लवीची एंट्री, सीतेची भूमिका साकारणार

तमिळ चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी तिच्या साधेपणाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनेत्री तिच्या चित्रपटातील पात्रांबाबतही खूप सजग असते. हेच कारण आहे की ती अत्यंत निवडकपणे तिचे चित्रपट साइन करणं पसंत करते. आता अभिनेत्री सई पल्लवी लवकरच बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीकडे वाटचाल करू शकते. अभिनेत्री सई पल्लवी सुपरस्टार रणबीर कपूर स्टारर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार असून या चित्रपटात ती सीता माताची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत दक्षिणेतील चित्रपट निर्माता अल्लू अरविंद यांच्या रामायणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 
 
रामायणावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून या चित्रपटाच्या स्टार कास्टबाबत विविध अफवा इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत. आता अशी चर्चा आहे की साऊथ अभिनेत्री साई पल्लवी (साईपल्लवी सेंथामराय) 'रामायण'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.पॅन इंडिया चित्रपटाच्या स्टार कास्टबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. 
 
Edited by - Priya Dixit