testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सलमाननं जाहीर केली अक्षयच्या सूर्यवंशीच्या रिलीजची तारीख

salman rohit
रोहित शेट्टीचा सिम्बा बघितल्यावर निश्चितच प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे सूर्यवंशी या सिनेमाची. यात अक्षय कुमार असणार म्हटल्यावर सर्वांना रोहित- अक्षय जोडी काय धमाल करते हे बघण्याची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल गोंधळ सुरू असताना सलमान खानने स्वत: आपल्या ट्विटर अकाउंटवरून याची रिलीज डेट जाहीर केलीय.
'सूर्यवंशी' हा चित्रपट 27 मार्च 2020 ला प्रदर्शित होणार असल्याचं सलमानं ट्विट केलं आहे. यात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असेल.

ईदच्या मुहूर्तावर सलमान खानच्या चित्रपटांची धमाल असते. ईदच्या दिवशी सलमानच्या चित्रपटाची प्रेक्षक देखील वाट बघत असतात. आणि तिकिटांची बुकिंग तर आधीपासून फुल होते. अशात पुढील वर्षी ईदच्या प्रसंगी सूर्यवंशी रिलीज होणारी अशी चर्चा होत असताना सलमान खानच्या या ट्विटमुळे भाईजनचा प्रभाव कळून येतो.
2020 च्या ईदला सलमान खान आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्यात रुपेरी पडद्यावर जंग होणार असं वाटत होतं. कारण पुढील ईदला संजय लीला भन्साली दिग्दर्शित आणि सलमान खान स्टारर इंशाअल्लाह हा चित्रपट रिलीज होणार आहे. याच दिवशी रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अक्षय कुमारची भूमिका असलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा होत्या.

रोहित शेट्टीच्या सिनेमाला देखील प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळतो त्यामुळे प्रेक्षकांचा कळ कोणत्या बाजूला असणार अशी चर्चा रंगली होती. प्रेक्षक कुणाला पसंती देणार असा प्रश्न पडत होता पण अखेर रोहित शेट्टीने एक पाऊल मागे घेत आपल्या सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकली आहे. आता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट 27 मार्च 2020 ला प्रदर्शित होणार असल्याचं सलमाननं आपल्या ट्विटर अकाउंटवरून जाहीर केलंय.

सलमानने अगदी इमोशनल पोस्ट टाकत म्हटलं की मी कायम रोहितला माझा लहान भाऊ समजतो, ते त्यानं सिद्ध करून दाखवलं आहे असं ट्विट सलमान खाननं केलं आहे. सलमाननं रोहितसोबतचा फोटोही पोस्ट केला आहे.

संजय लीला भन्साळींच्या 'इंशाअल्लाह' या आगामी चित्रपटात आलिया भट्ट आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदला प्रदर्शित होत असल्यामुळे रोहितने 'सूर्यवंशी'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकली आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

ब्लॅक बिकिनी घालून दिशा पाटनीने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ...

national news
बॉलीवूडची हॉट अदाकारा दिशा पाटनीचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर खूप पसंत करण्यात येत आहे. ...

वेशभूषाकार सायली सोमण यांनी दिला 'मिस यू मिस्टर'च्या ...

national news
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘मिस यु मिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात ...

पांढरे शुभ्र डोंगर आणि नर्मदेचा शांत निळा प्रवाह अर्थातच ...

national news
मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वताच्या अंगाखांद्यावरून हिंदोळे घेत नर्मदा नदी प्रवास करत आहे. ...

राहुल गांधी यांचे फोटो तास न तास बघत होती करीना, या ...

national news
काही दिवसांअगोदर एक्ट्रेस आणि मॉडल माहिका शर्माने तर राहुल गांधीच्या प्रेमात उपास देखील ...

‘लाल बत्ती’ चा उत्कंठावर्धक टीझर

national news
पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’या चित्रपटाचा ...