सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (14:31 IST)

साराला 'केदारनाथ'ची प्रतीक्षा!

बराच काळ रखडलेल्या 'केदारनाथ' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची कन्या सारा या चित्रपटातून पदार्पण करते आहे. 2013 मध्ये केदारनाथ धामात आलेल्या प्रलयंकारी महापुराची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. पुराचे चित्रीकरण करण्यासाठी 50 लाख लीटर पाण्याचा वापर करण्यात आला. अर्थातच हे पाणी एका मोठ्या वॉटर टँकमध्ये सेट तयार करून सोडण्यात आले होते! या चित्रपटाच्या ट्रेलरने उत्सुकता वाढवली असल्याने सारालाही आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाचे वेध लागले आहेत. 
 
चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमावेळी तिने ही उत्सुकता बोलूनही दाखवली. हा चित्रपट 7 डिसेंबरला पडद्यावर येत आहे. चित्रपटात यात्रेकरूंना पाठीवर बसवून मंदिरापर्यंत नेणार्‍या एका स्थानिक मुस्लीम युवकाची आणि हिंदू तरुणीची प्रेमकहाणी आहे. जहाजाची दुर्घटना प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर दर्शवण्यात आली होती, तसाच प्रकार यामध्ये करण्यात आला आहे. 'केदारनाथ'मधील महापुराच्या भीषण आपत्तीची कथा यामध्ये या प्रेमकथेच्या आधारे दर्शवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्यामाहितीनुसार चित्रपटातील पुराचे दृश्य चित्रीत करण्यासाठी पाण्याच्या 470 टँकरचा वापर करण्यात आला. प्रत्येक टँकरमध्ये दहा हजार लीटर पाणी होते. ट्रेलरमधून सुशांत आणि साराची दमदार केमिस्ट्री दिसून येत आहे. ट्रेलरमध्ये साराने पहिल्याच चित्रपटात चांगला अभिनय केल्याचे दिसून येते.