कुली नंबर 1 चा ‘सारा' खेळ खल्लास!
परिस्थिती कशी कुणाला वाकवेल याचा नेम नसतो. गेल्या चार पाच महिन्यात हिंदी इंडस्ट्रीत घडणार्याम घडामोडींनी हे पदोपदी दाखवून दिले आहे. सध्या अभिनेत्री सारा अली खानही त्याच फेजमधून जात आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने जो तपास चालू केला त्यात सारा अली खानही होती. तिच्यावर झालेले आरोप आणि तिने एनसीबीला दिलेली उत्तरे ही लोकांना कळली.
एनसीबीच्या चौकशीचा आणि तिने त्यांच्याकडे दिलेल्या उत्तराचा फटका तिला बसेल आणि परिणामी सिनेमालाही बसेल असे निर्मात्यांना वाटत आहे. सारा अली खानची चौकशी एनसीबीने केली तेव्हा, तिने सुशांत अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे सांगितले. साराचे सुशांतसोबत असलेले अफेअर, सुशांत आणि तिने केलेली ट्रीप अशा अनेक गोष्टी त्यात समोर आल्या होत्या. आता कुली नंबर 1 च्या प्रमोशनासाठी साराला आणले तर मीडिया तिला तेही प्रश्न विचारेल अशी भीती निर्मात्यांना वाटते. तर त्याची उलटी पब्लिसिटी होऊन सिनेमावर परिणाम होऊ नये असे निर्मात्यांना वाटते. त्यामुळे तूर्त साराला सिनेमाच्या पब्लिसिटीपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहाणे कुतुहलाचे ठरणार आहे.