बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (16:42 IST)

महक चहलच्या जागी सारा खानची वर्णी

'एक थी रानी एक था रावण'मध्ये महक चहलच्या जागी आता टेलिव्हिजनवरील सर्वांची आवडती सारा खान दिसून येणार आहे. हल्लीच गायिकेच्या रूपातदिसून आलेली सारा 'स्लमडॉग मिलेनियर'मधील रिंग रिंग रिंगावरील आपल्या डान्स मूव्हस्‌नी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येईल. या डान्स परफॉर्मन्ससाठी आधी महकला घेण्यात आले होते. आता तिच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे तिच्या जागी सारा खान दिसून येईल. अभिनयाच्या पलीकडे सारा खान संधी शोधत असताना या संधीबद्दल ती अतिशय उत्साहात आहे. तिने आपला सराव सुरू केला असून, ती लवकरच शोमधील या डान्स सीक्वेन्सच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल. सारा म्हणाली, खुद्द ए. आर. रेहमान यांच्या गाण्यावर परफॉर्म   करण्याबद्दल मी खूपच उत्साहात आहे. महक ही एक उत्तम डान्सर आहे आणि आपल्या मूव्हस्‌सह तिने मंचाला अक्षरशः आग लावली आहे. त्यामुळे या परफॉर्मन्सला पूर्ण न्याय देण्यासाठी मी अथक मेहनत घेत आहे. एक थी रानी एक था रावणचा हिस्सा बनणे ही माझ्यासाठी एक मोठी संधी असून, मी यासाठी खूपच उत्सुक आहे.