testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

देशातच नव्हे तर परदेशातही शाहरूख सर्वात श्रीमंत अभिनेता

Last Modified शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (12:15 IST)
टी.व्ही.च्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झेप घेऊन शाहरूख खानने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले होते. आता तर तो देशातीलच नव्हे, तर जगातील एक बडा स्टार आहे. सर्वाधिक कमाई करण्याबाबतही तो जगभरातील अव्वल अभिनेता ठरला आहे. जगातील 20 कलाकारांच्या यादीत शाहरूख पहिल्या क्रमांकावर असून, अमिताभ बच्चन चौथ्या क्रमांकावर आहेत. शाहरूखची एकूण सरासरी कमाई 750 दशलक्ष डॉलर्स आहे. अमिताभयांची कमाई 425 दशलक्ष डॉलर्स आहे. शाहरूखने हॉलिवूडचा स्टार टॉम क्रुज याला मागे टाकून यादीत अव्वल स्थान पटकावलेले आहे हे विशेष! टॉम क्रुजची संपत्ती 550 दशलक्ष डॉलर्स आहे. तिसर्‍या स्थानावर जॉर्ज क्लूनी असून, त्याची संपत्ती 500 दशलक्ष डॉलर्स आहे. पाचव्या स्थानापासून मेल गिब्सन (425 दशलक्ष), जॅक निकल्सन (400 दशलक्ष), सिल्वेस्टर स्टॅलोन (400 दशलक्ष) आणि जॅकी चॅन (395 दशलक्ष) यांचे क्रमांक लागतात. शाहरूख सध्या 'झीरो' या चित्रपटात मग्न असून, त्यामध्ये त्याने एका बुटक्याची भूमिका साकारली आहे. बर्‍याच काळापासून शाहरूखचा नवा चित्रपट आलेला नसल्याने त्याची सद्दी संपली असल्याचे म्हटले जाऊ लागले. मात्र, शाहरूख अजूनही कमाईच्या बाबतीत तरी देशातच नव्हे तर परदेशातही आघाडीवर असल्याचे या यादीतून दिसून आले आहे.


यावर अधिक वाचा :

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

national news
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा ...

परिणितीची इच्छापूर्ती

national news
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की इच्छा आणि स्वप्ने नियतीच्या मनात असेल त्याच वेळेस पूर्ण ...

विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

national news
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा