झीरोच्या अपशयाने शाहरूख सतर्क

बॉलिवूड किंग शाहरूख खानचा अखेरचा प्रदर्शित चित्रपट झीरो हा फार काही काळ बॉक्स ऑफिसवर तग धरू शकला नाही. त्यामुळे आता शाहरूख आपल्या चित्रपटाचे सिलेक्शन खूप विचारपूर्वक करतो. शाहरूख गेल्या काही वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर खास काल करू शकलेला नाही. त्याचा अखेरचा प्रदर्शित चित्रपट झीरोदेखील चालला नाही. त्याचबरोबर क्रिटिक्सनेदेखील या चित्रपटाकडे पाठ फिरवली. त्यामुळे शाहरूख आता आपल्या चित्रपटांची निवड खूप विचारपूर्वक करू लागला आहे.

शाहरूख हा पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर बनणार्‍या सारे जहां से अच्छा या चित्रपटामध्ये काम करणार असल्याची चर्चा बर्‍याच काळापासून बॉलिवूडमध्ये रंगली होती. परंतु त्या नंतर त्याने या चित्रपटातून अंग काढून घेतले. त्यामुळेच की काय, शाहरूखला झीरोच्या अपयशाने चांगलेच सतर्क केले असल्याचे वाटू लागले आहे.

तूर्तास त्याच्या आगामी चित्रपटाचीअधिकृत घोषणा होणे बाकी आहे, परंतु यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना
शाहरूखने आपल्या भीतीविषयी उलगडा केला. शाहरूख म्हणाला, मला त्या दिवसाची भीती वाटते, जेव्हा मी देखील रोल्सविषयी रिस्क घेण्याचे टाळू लागेन व बोरिंग चित्रपटांमध्ये जुन्या व्यक्तिरेखा साकारण्यास सुरुवात करेन. मला सकाळी अशाप्रकारे उठायचे नाहीयं, ज्यावेळी मी प्रयोग करून थकलेलो असेन व 40 दिवसांमध्ये संपणार्‍या चित्रपटांमध्ये अडकून पडेन. शाहरूखने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने दिग्दर्शक व वेगवेगळ्या कथांबरोबरही प्रयोग केले आहेत. एकीकडे त्याने फॅनमध्ये डार्क व इंटेंस डबल रोल केला होता, तर झीरोमध्ये त्याने एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारली होती, परंतु तरीही हे चित्रपट कमाईच्या बाबतीत मागेच राहिले.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

मांड व १ कप चाय.

मांड व १ कप चाय.
बाळु- अबे मले सांग मंग्या हा विदर्भ मनजे का हाय बे

सोनू सूदने मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जाहीर केला, चाहते ...

सोनू सूदने मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जाहीर केला, चाहते म्हणाले- 'रील लाइफ के विलेन तुम रियल में हो हीरो'
बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद गरजू लोकांसाठी खरा नायक बनला ...

'बंटी और बबली' चे 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बिग बी यांनी ...

'बंटी और बबली' चे 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बिग बी यांनी मुलगा आणि सून यांच्यासह एक फोटो शेअर केला, तसेच हा मेसेज ही लिहिला
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा बंटी और बबली या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 15 वर्षे झाली आहेत. ...

हुरहुन्नरी कलाकार गिरीश साळवी यांचे निधन

हुरहुन्नरी कलाकार गिरीश साळवी यांचे निधन
अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अशी ओळख असलेल्या गिरीश साळवी (५५) यांचे ...

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना
दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट येताच त्या ...