1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (09:54 IST)

शाहरुख खानने 'पठाण'च्या शूटिंगला सुरुवात केली, चाहते म्हणाले-' या क्षणाची बरीच प्रतीक्षा केली होती '

shahrukh khan
वर्ष 2018 नंतर बॉलीवूडचा शाहरुख खान यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘पठाण’ चित्रपटात बघायला मिळणार आहे. शाहरुखने या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे, त्यानंतर त्याचे शूटिंगचे एक चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक शाहरुखचे मनापासून स्वागत करत आहेत.
  
चाहते सतत ट्विट करत आहे 
ट्विटरवर शाहरुखच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की ते बर्‍याच दिवसांपासून या वेळेची वाट पाहत होते. तर तिथे कोणी म्हटलं की सिंह आला आहे. शाहरुखने शूटिंग सुरू केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आनंदी होण्यास जागा नाही. या चित्रपटात शाहरुखसोबत  दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.