शनिवार, 25 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (13:57 IST)

गायक आदित्य नारायण चाहत्यावर भडकला, माईक ने मारले

Singer Aditya Narayan
गायक आदित्य नारायण हा त्याच्या रांगेमुळे नेहमी चर्चेत असतो. या वरून त्याला ट्रोल  केलं जात. एका कॉन्सर्ट मध्ये आदित्य नारायण याने एका चाहत्यावर राग आला म्हणून त्याने चक्क त्याला माईक ने मारलं आणि त्याचा फोन फेकून दिला.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आदित्य छत्तीसगडच्या भिलाई येथे एका महाविद्यालयीन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला त्यावेळी एका चाहत्याने त्याच्या व्हिडीओ बनवायला सुरु केले आणि हे पाहून गायकाचा राग अनावर झाला आणि त्याने माइकने चाहत्याला मारले आणि त्याचा फोन गर्दीत फेकला.आदित्य नारायणाचे असे वागणे पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहे. व्हिडीओ मध्ये दिसत आहे की आदित्यने त्या तरुणाला माईक मारला आणि त्याचा फोन हिसकवून लांब फेकून दिला. आदित्यचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  
 
 Edited by - Priya Dixit