बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (11:41 IST)

सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजाची 27 कोटींची सायबर फसवणूक

Sonam Kapoor's father-in-law Harish Ahuja's Rs 27 crore cyber fraud सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजाची  27 कोटींची सायबर फसवणूकBollywood Gossips Marathi News Bollywood Marathi  News In Webdunia Marathi
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या कुटुंबाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा यांची सुमारे 27कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. हरीश आहुजाच्या फरीदाबाद येथील कंपनी शाही एक्सपोर्ट फॅक्टरमधून  27 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे.
 
रिबेट ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्स अँड लेव्हीज (ROSCTL) परवान्याद्वारे ही फसवणूक केली आहे. खरं तर, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कंपन्यांना विशेष सूट देते, ज्याला ROSCTL परवाना म्हणतात. सामान्य भाषेत याला डिस्काउंट कूपन म्हणता येईल. हरीशच्या कंपनीकडे किती रकमेचे आरओएससीटीएल परवाने आहेत हे आरोपींना समजले.

आरोपींनी बनावट पद्धतीने डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) जारी केले आणि नंतर आणखी काही औपचारिकता पूर्ण करून फसवणूक करून त्यांच्या खात्यातुन  पैसे हस्तांतरित केले.या प्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे.