1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:34 IST)

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ च्या कमाईत घट

subh mangal jyada sawdhan collection down
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. आयुष्मानच्या या चित्रपटाने पहिल्या दिवसांपासूनच बॉक्स ऑफीवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत आहे.  चौथ्या दिवशी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाने फक्त ३.५० कोटींची कमाई केली आहे. यानुसार चार दिवसात या चित्रपटाने ३४ कोटींची कमाई केली आहे.
 
‘गे’ प्रेमकथेवर आधारित असलेला या चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांची मन जिंकत आहे. तसंच आयुष्मान खुराना देखील चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असं असलं तरी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद बॉक्स ऑफिवर मिळत आहे. या चित्रपटाची कहाणी समलैंगिक जोडप्या विषयी आहे. आयुष्मान खुराना आणि अमन त्रिपाठी हे दोघं चित्रपटात प्रेमी युगुल दाखवलं आहे.
 
या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, गजराव राज आणि पंखुरी अवस्थी देखील आहे.