1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जून 2024 (12:17 IST)

कोटेशन गँग मधला सनी लिओनी चा पहिला लूक आउट

Quotation Gang
बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर सनी लिओनीने तिच्या 'कोटेशन गँग' या तमिळ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. अभिनेत्रीने दोन पोस्टर शेअर केले ज्यात सनी याआधी कधीही न दिसलेल्या अवतारात दिसणार आहे. पहिल्या पोस्टरमध्ये सनी स्कर्टवर एक चेकर्ड शर्ट मध्ये दिसतेय प्रिया मणीच्या पात्रासोबत ती यात दिसतेय. एका धाडसी ग्रामीण माफिया ची भूमिका सनी साकारणार आहे सनीने तिच्या सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले. 
 
तिने पोस्टर शेअर करताच चाहत्यांनी अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. प्रिया मणी आणि श्रॉफ व्यतिरिक्त सनी लिओनी प्रसिद्ध अभिनेत्री सारा अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विवेक कुमार कन्नन दिग्दर्शनात सनी लिओनी एक महत्त्वपूर्ण आणि आकर्षक भूमिका साकारते जी एक अभिनेत्री म्हणून पुन्हा छाप पाडणार आहे.

या चित्रपटात तिला मारेकरी म्हणून दाखवण्यात आले आहे जी एका निर्दयी टोळीची प्रमुख सदस्य आहे, जी कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये माहिर आहे.
 
'कोटेशन गँग' व्यतिरिक्त सनीने अनुराग कश्यपच्या 'केनेडी' आहे.
 
तिच्याकडे हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवा यांच्यासोबत एक शीर्षकहीन चित्रपट असून निर्मितीमध्ये एक शीर्षकहीन मल्याळम चित्रपट देखील आहे. अभिनेत्री सध्या 'Splitsvilla X5' होस्ट करत आहे आणि OTT वर 'ग्लॅम फेम' जज करण्यासाठी सज्ज आहे.