1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 15 एप्रिल 2020 (14:12 IST)

सनीचा ‘चपाती डान्स’ पाहिला का?

sunny-leone
सरकारने लॉकडाउनचा काळ येत्या 3 मे पर्यंत वाढवला आहे. कुठल्याही उद्योगाविना घरात बसून कंटाळलेल्या लोकांना अभिनेत्री सनी लिओनी आता डान्स करायला शिकवत आहे. तिने नुकताच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील सनीच्या सिग्नेचर डान्स स्टेप शिकू शकता.
सनी लिओनीने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी ‘चपाती' आणि ‘जिलेबी' डान्स कसा करायचा ते चाहत्यांना शिकवत आहे. या अगदी सोप्या स्टेप्स पाहून तुम्ही देखील सनीप्रमाणे एक तरबेज डान्सर होऊ शकता, असे सनीला वाटते.

सनीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकर्‍यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या  आहेत. काही चाहत्यांनी तर सनीला आणखी असे व्हिडिओ तयार करण्याती विनंती केली आहे. कारण त्यांना सनीप्रमाणेच एक उत्तम डान्सर होण्याची इच्छा आहे.