सुशांतचं कुटुंब सीबीआय तपासावर नाराज

sushant singh rajput
Last Modified शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (10:57 IST)
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सध्या सीबीआयकडून (CBI)केला जात आहे. मात्र, सुशांतच्या कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांपाठोपाठ सीबीआयच्या तपासावरही नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास भरकटला असल्याचं सांगत सुशांतचे कुटुंबीय तपासावर नाराज असल्याचा दावा सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी केला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील (Mumbai)वांद्रे परिसरात असलेल्या घरात गळफास घेतला होता. सुरूवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांच्या मागणीवरून सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं होतं. सध्या सीबीआय प्रकरणाचा तपास करत आहे.
दरम्यान, सुशांतचे
वडील के.के. सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सुशांतचे कुटुंबीय सीबीआयच्या तपासावर नाराज असल्याचं म्हटलं आहे. “ज्या प्रकारे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यावरून सुशांतच्या कुटुंबीयांना असं वाटतंय की यातून सत्य बाहेर येणार नाही. एनसीबीनंही मुंबई पोलिसांसारखच सुरू केलं आहे. एका एका कलाकाराला बोलवलं जात आहे. हा सगळा तपास मुंबई पोलिसांच्या तपासाप्रमाणेच सुरू आहे. यात सुशांतचं प्रकरण पाठीमागे पडलं आहे,” असं विकास सिंह म्हणाले.

“सुशांतच्या कुटुंबीयांना वाटत की, या प्रकरणाचा तपास वेगळा दिशेनं व्हायला हवा. यात सगळं लक्ष ड्रग्ज (drugs)प्रकरणावर केंद्रित केलं गेलं आहे. एम्सच्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, सुशांतचा मृत्यू गळा दाबल्यानं झाला आहे. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू नाहीये. या तपासावर मी नाखुश आहे. हे प्रकरण कोणत्या दिशेनं जात आहे माहिती नाही. आम्ही हताश आहोत. या प्रकरणात आतापर्यंत काय आढळून आलं, यासंदर्भात सीबीआयनं (CBI)एकदाही माहिती दिलेली नाही,” असं विकास सिंह म्हणाले.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

धर्मेंद्र-हेमा मालिनी हे आजोबा आणि आजी झाले, कन्या अहानाने ...

धर्मेंद्र-हेमा मालिनी हे आजोबा आणि आजी झाले, कन्या अहानाने जुळ्या मुलींना जन्म दिला
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हे आजी आजोबा झाले आहेत. या दोघांची मुलगी अहाना देओलने जुळ्या ...

कुली नंबर 1 चा ट्रेलर रिलीज, खूप मजेदार वरुण-साराचा कॉमेडी

कुली नंबर 1 चा ट्रेलर रिलीज, खूप मजेदार वरुण-साराचा कॉमेडी
वरुण धवन आणि सारा अली खानचा चित्रपट कुली नंबर

'रुद्रकाल'चे थरारनाट्य लवकरच !

'रुद्रकाल'चे थरारनाट्य लवकरच !
प्रेक्षकांना नवनवीन मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी मिळत असतानाच, आता हॉटस्टार आणि ...

संजू बाबाच्या 'तोरबाझ'चा दमदार ट्रेलर रिलीज

संजू बाबाच्या 'तोरबाझ'चा दमदार ट्रेलर रिलीज
संजय दत्तचा लीड रोल असलेला ‘तोरबाझ' लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ...

निगेटिव्ह रोलला मिळाला पॉझिटिव्ह प्रतिसाद

निगेटिव्ह रोलला मिळाला पॉझिटिव्ह प्रतिसाद
आश्रम या वेबसीरीजमध्ये बॉबी देओलने बाबा राम रहिमची निगेटिव्ह प्रतिमा रंगवली आहे. या ...