testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अजय देवगण साकारणार तानाजी मालुसरे, फर्स्ट लूक शेअर

taanaji ajay devgan
Last Modified गुरूवार, 20 जुलै 2017 (12:02 IST)

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल अनेक पुस्तकांमधून तसंच सिनेमांमधून माहिती उपलब्ध आहे. मराठीमध्ये तर बरेच सिनेमे बनले आहेत. पण आता शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यकथांची दखल बॉलिवूडनेही घेतल्याचं दिसतं आहे. अभिनेता अजय देवगणने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत

झळकणार आहे.

‘तो लढला… त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याच्या राजासाठी छत्रपती शिवाजींसाठी. भारताच्या दैदीप्यमान इतिहासातील शूर मावळा तानाजी मालुसरे’, असं कॅप्शन देत अजयने सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला आहे.


यावर अधिक वाचा :