लवकरच “द कपिल शर्मा शो’बंद होणार  
					
										
                                       
                  
                  				  “द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होण्याची चिन्हे आहेत. सोनी चॅनल आता कपिल शर्मासोबत कॉंन्ट्रक्ट रिन्यू करण्याच्या मूडमध्ये नाही. वारंवार खाली जाणारा टीआरपी आणि कपिल शर्माची खराब तब्येत हे दोन कारणे या मागे असल्याचे बोलले जात आहे.
				  													
						
																							
									  
	 
	सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅनलचे कपिलसोबत असलेले कॉंट्रॅक्ट एप्रिलमध्ये पूर्ण झाले आहे आणि आता चॅनल आणि कपिलमध्ये कोणत्याच प्रकारचा करार झालेला नाही.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	शो बंद होण्याचे प्रमुख कारण कपिलची खराब तब्येत असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील एक-दीड महिन्यापासून कपिल वारंवार सेटवर चक्कर येऊन पडत असे. त्यामुळे प्रमोशनमुळे आलेल्या अनेक स्टार्सना प्रमोशन न करताच परतावे लागले होते. कपिल त्याचा आगामी चित्रपट “फिरंगी’ च्या सेटवरही अनेकदा बेशुद्ध पडला आहे.