सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (12:33 IST)

सैफिनाच्या छोट्या नवाबाचे नाव?

अभिनेत्री करिना कपूर खान, अर्थात हिंदी कलाविश्वातील ‘बेबो' म्हणून ओळखल्या जाणार्याह या अभिनेत्रीच्या घरी तिच्या दुसर्या बाळाचा जन्म झाला आहे. हो, अभिनेता सैफ अली खान व करिना कपूर यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अतिशय आनंदानं कपूर आणि खान परिवारानं त्यांच्या बाळाचं स्वागत केलं. करिनाने बाळाला जन्म दिला असल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं आहे.
 
सध कपूर, खान परिवार अतिशय आनंदात आहेत. आता सोशल मीडियावर करिना आणि सैफ आपल्या दुसर्या बाळाचे काय नाव ठेवणार यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत. यासंदर्भातील अनेक मिम्ससुद्धा टि्वटर आणि इन्स्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहेत. सैफ-करिनाने आपल्या मुलाचे नाव ‘तैमूर' ठेवल्यामुळे सुद्धा चर्चेला उधाण आले होते. 2016 मध्ये करिना व सैफच्या पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला होता.