गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

हिंदीत प्रदर्शित होणार प्रभास आणि अनुष्काचा बिल्ला

जगभरात बाहुबली 2 च्या ऐतिहासिक यशानंतर बाहुबली प्रभास हा लोकप्रिय झाला आहे. लोक बाहुबलीमुळे केवळ प्रभासचेच नाही तर देवसेनेची भूमिका करणार्‍या अनुष्का शेट्टीचे फॅन झाले आहेत. या दोघांची जोडी कमालीची लोकप्रिय झाल्यामुळे या दोघांना पुन्हा पुन्हा एकत्र बघण्यासाठी त्यांचे फॅन आतुर झाले आहेत.
बाहुबली आधीही काही साऊथ चित्रपटांमध्ये प्रभास आणि अनुष्काने एकत्र काम केले आहे. त्यांचा 2009 मध्ये आलेला बिल्ला हा चित्रपट सुपरहिट झाला होता. हाच चित्रपट आता हिंदी भाषेत रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचे निर्माता या दोघांची लोकप्रियता कॅश करण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या या दोघांची चर्चा जोरात रंगली असल्याने निर्मात्यांनी या चित्रपटाचा एक हिंदी टीजरही रिलीज केला आहे.
 
प्रभास अॅक्शन अवतारात तर अनुष्का शेट्टी ही आधुनिक ग्लॅमरस लूक या टीजरमध्ये बघायला मिळत आहे. प्रभासने या चित्रपटात डबल रोल साकारला आहे. 
 
हिंदीत हा चित्रपट रेबल 2 या नावाने रिलीज केला जाणार आहे. बिल्ला याच नावाने तमिळामध्ये बनलेल्या चित्रपटाचा रिमेक होता. या आधी या चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनमध्ये एनटी रामा राव आणि तमिळ व्हर्जनमध्ये रजनीकांतने मुख्य भूमिका केली होती.
 
असे म्हटले जाते की 1978 मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट डॉन वरून या चित्रपटाचे हे दोन्ही व्हर्जन प्रेरित आहेत.