रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (14:21 IST)

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या रिअल ॲक्शन फिल्म 'बडे मियाँ छोटे मियाँ' च्या टायटल ट्रॅक पोस्टरने वेधलं लक्ष

bade miya chote miya
Photo- Instagram
चर्चा बडे मियाँ छोटे मियाँ' च्या टायटल ट्रॅक पोस्टरची  अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' टायटल ट्रॅक पोस्टर सोशल मीडिया वर व्हायरल 
 
 खिलाडी अक्षय कुमार आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी रिअल ॲक्शन फिल्म 'बडे मियाँ छोटे मियाँ' टायटल ट्रॅक पोस्टर सोशल मीडिया वर व्हायरल होतंय या पोस्टर च्या चर्चा सर्वत्र होताना दिसतात. 
 
या ॲक्शन जोडीने सोशल मीडिया वर हे खास पोस्टर शेयर केलं आहे.
 "बडे का स्वॅग , छोटे का स्टाइल 3 दिवस बाकी ! #BadeMiyanChote Miyan Title Track out on 19 February 2024 #बडेमियाँछोटे मियाँOnEid2024"  
 
 हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. अक्षय कुमारच्या सिग्नेचर स्टाइलसह आणि टायगर श्रॉफने त्याचा 'टायगर इफेक्ट' यातून दाखवला आहे. ईदच्या दिवशी ॲक्शन-पॅक परफॉर्मन्स बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 
 
 
 पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्स निर्मित, आणि अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँ मध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.