रविवार, 7 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (13:40 IST)

बाहुबलीचा अजून एक पार्ट येतोय मात्र तो नेटफ्लिक्सवर

another part of Bahubali
चित्रपट रसिक त्यातही बहुबलीचे चाहिते यांच्यासाठी मोठी बातमी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास रचणाऱ्या बाहुबली चित्रपटाची आणखी एक कथा लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सध्या वेब सिरीजचे वेड सर्वत्र आहे. याचाच फायदा घेत सध्या नेटफ्लिक्सवर सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'सेक्रेड गेम्स' या वेब सिरीज सुपरहिट झाली आहे. त्यावरुनच नेटफ्लिक्सवरील वेब सिरीजला भारतातही मोठा प्रेक्षकवर्ग लाभला असून त्यामुळेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजमौली यांच्या बाहुबली चित्रपटाची आणखी नवीन एक वेब सिरीज नेटफ्लिक्स या प्रसिद्ध इंटरनेट प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. तो इतर ठिकाणी प्रसिद्ध होणार नाही. बाहुबली चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक विशिष्ट ओळख निर्माण केली, अयम्ध्ये विशेषतः बाहुबली, कटप्पा, शिवगामी हे तीन पात्र विसरणे तर प्रेक्षकांना शक्यच नाहीत. 
 
‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ या दोन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता या बाहुबली चित्रपटाच्या आधीची कथा नेटफ्लिक्सवरुन झळकणार आहे. म्हणजेच, ‘बाहुबली : द बिगनिंग’ या चित्रपटापूर्वीची कहाणी इंटरनेटच्या माध्यमातून चाहत्यांना पाहायला मिळेल. त्यामुळे मोठी पर्वणी प्रेक्षक वर्गाला मिळणार आहे.