1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. tiger jinda hai

‘टायगर जिंदा है’ चे चित्रिकरण सुरु होणार

tiger jinda hai

‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अबु धाबीमध्ये चित्रिकरणाला  सुरुवात करत असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे लिहिले की, ‘टायगर जिंदा है’साठी लोकेशन शोधण्याचा शेवटचा दिवस असून चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे. पुन्हा एकदा चिंताग्रस्त आणि उत्सुक आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे चित्रिकरण मोरॉक्को, व्हिएन्ना आणि मुंबईत करण्यात आले. त्यानंतर आता अबु धाबीमध्ये करण्यात येणार आहे. ‘टायगर जिंदा है’ हा 2012 साली रिलीज झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल आहे.  या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सलमान खान भारतीय एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे तर कॅटरिना कैफ ही पाकिस्तानी एजंटची भूमिका करणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान व कॅटरिना कैफ ‘टायगर जिंदा है’ च्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.

पुढील लेख
महाराष्ट्राचा जयघोष करणारा 'एक आमचा बाणा'