1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (12:52 IST)

Toofaan Trailer: 'तूफान' ट्रेलर रिलीज, फरहान अख्तर तूफानी शैलीत दिसला

toofaan-official-trailer-2021-starring-farhan akhtar
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज यंदाच्या बहुप्रतीक्षित फिल्म ‘तूफान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि आरओएमपी पिक्चर्सच्या संयुक्त विद्यमाने अमेझॉन प्राइम व्हिडिओद्वारे सादर केलेले, तूफान हे रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी निर्मित एक प्रेरणादायक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्यासह फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत.
 
हिंदी आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी प्रीमियर होईल
राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रेक्षकांना अज्जू भाईच्या प्रवासाला घेऊन जातो, जो नंतर व्यावसायिक बॉक्सर अझीझ अली बनतो,. 'तूफान' ही उत्कट इच्छा व चिकाटीची कहाणी आहे जी आशा, आस्था आणि आतील चिकाटीने प्रेरित आहे. 240 देश आणि प्रदेशात 16 जुलै, 2021 पासून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये एकाचवेळी प्रीमियर करणारा 'तूफान' देखील पहिला चित्रपट बनेल.