Widgets Magazine
Widgets Magazine

माझ्या आईचे वय 60 वर्षे : नितारा

ट्‌विंकल खन्नाचे वय 60 वर्षे आहे, असे जर कोणी सांगितले तर तुम्हाला हसायला येईल. पण ट्‌विंकलची मुलगी निताराच्या मते तिच्या आईचे वय 60 वर्षे आहे. हे ऐकून ट्‌विंकललाच हसायला आले. झाले असे की 4 वर्षाच्या निताराच्या शाळेमध्ये “मदर्स डे’च्या निमित्ताने एक उपक्रम आयोजित केला गेला होता. त्यामध्ये सगळ्या मुलांना आपल्या आईबद्दल काही तरी लिहायला सांगितले होते. गाळलेल्या जागा भरण्याच्या एका फॉर्ममध्ये निताराने आपल्या आईचे, म्हणजे ट्‌विंकलचे वय 60 वर्षे असल्याचे लिहीले. याशिवाय आई दिवसभर कॉम्प्युटरवर बसून काम करते आणि खूप चांगली कॉफी करते, असेही निताराने लिहीले आहे. आई घरातली सगळी कामे करते आणि माझ्यासाठी टिफीनही करून देते, म्हणून ती अगदी “सुपर’ आहे, असेही निताराने लिहीले आहे. निताराच्या बालबुद्धीने ट्विंकलने अगदी स्वभावाप्रमाणे प्रामाणिकपणे दिलखुलास दाद दिली आहे.

एवढेच नव्हे तर इन्स्टाग्रामवर निताराच्या फॉर्मची इमेजही तिने पोस्ट केली आहे. निताराच्या निरीक्षणानुसार आपण कॉम्प्युटर डेस्कला अगदी चिकटून असल्याचेही तिने मान्य केले आहे. आता किमान “वीक एन्ड’ला तरी कॉम्प्युटरला सुटी देण्याचा तिचा विचार आहे. ट्‌विंकलला आरव हा मुलगा आणि मुलगी नितारा अशी दोन अपत्ये आहेत. ऍक्‍टिंग थांबवल्यावर तिने अक्षय कुमारच्या “पॅडमॅन’च्या निर्मिती करायला घेतली आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सदैव दूर ठेवेन : रजनीकांत

तब्बल आठ वर्षांनंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ...

news

Birtday Special : माधुरी दीक्षितचे हे गाणे ऐकून आज देखील पाय थिरकायला लागतात

बॉलीवूडमध्ये धक धक गर्लच्या नावाने प्रसिद्ध माधुरी दीक्षित 50 वर्षांची झाली आहे. आज ...

मायकल जॅक्सनच्या मुलीचा पुन्हा अर्धनग्न फोटो

18 वर्षाच्या पेरिसने इंस्टाग्रामवरील अकाउंटवर आपला एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला ती ...

news

व्हिडीओ मेसेजद्वारा रजनीकांत यांना धमकी!

रजनीकांत यांचा आगमी सिनेमा मुंबईतील अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्झा यांच्या आयुष्यावर ...

Widgets Magazine