बुधवार, 1 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (14:40 IST)

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

Vaibhav Tatwadi seen the the Bollywood actress
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी त्याच्या चित्रपट व भूमिकेमुळे चर्चेत असतो. न्यू प्रोजेक्टबद्दल सांगितल्यानंतर वैभवने बॉलिवूड अभिनेत्री काजोलसोबत फोटो शेअर केला आहे आणि काजोलबद्दलचं त्याचं मत व्यक्त केलं आहे. त्रिभंगा या सिनेमाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे करत असून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.
 
वैभव मराठी चित्रपट 'पाँडिचेरी'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो सईसोबत दिसणार आहे. वैभव तत्त्ववादीने कॉफी आणि बरंच काही, व्हॉट्‌सअप लग्न यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
 
बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका यांसारख्या हिंदीचित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. आता वैभव विद्या बालनसोबत काम करणार आहे.