बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (08:55 IST)

Vijay Deverakonda:विजय देवरकोंडा यांच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याने त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याने अलीकडेच त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्टर शेअर करून त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटासाठी विजय देवरकोंडा यांनी 'जर्सी' फेम दिग्दर्शक गौतम नायडू तिन्ननुरी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. याला 'VD12' म्हणजेच विजय देवरकोंडाचा 12वा चित्रपट म्हटले जात आहे.

विजय देवराकोंडा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये विजयचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. मात्र, तो पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान केलेला दिसतो. याशिवाय पोस्टरमध्ये पाण्याच्या मध्यभागी एक जळणारे जहाज दिसत आहे. पोस्टर पाहता, विजयचा हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला असेल असे वाटते. विजय देवरकोंडा यांनी पोस्टरसोबत लिहिले आहे, 'द स्क्रिप्ट द टीम. माझा पुढील  चित्रपट  

विजयच्या या पोस्टवर यूजर्स खूप उत्सुक दिसत आहेत. एका यूजरने लिहिले, 'वाट पाहत आहे.' एका यूजरने लिहिले, 'ऑल द बेस्ट अण्णा.
 
 
Edited By - Priya Dixit