गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (17:53 IST)

कतरिना कैफ होणार आई?व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले ....

Will Katrina Kaif be a mother? Fans said after watching the video .... Katrina Kaif Pregent News In Webdunia Marathi Bollywood Marathi कतरिना कैफ होणार आई?व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले ....
फोटो साभार -सोशल मीडिया 
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अलीकडेच तिचा अभिनेता पती विकी कौशलसोबत सुट्टीवरून परतली आहे. लग्नानंतर दोघेही करिअरमध्ये व्यस्त असूनही एकमेकांसोबत रोमँटिक क्षण घालवत आहेत.तर ,आता कतरिना कैफचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहून कतरिना आई होणार असल्याचा दावा केला जात आहे.
 
खरंतर हा व्हिडिओ कतरिनाच्या मुंबई एअरपोर्टचा आहे ज्यामध्ये कैफ लूज कुर्ता, प्लाझो आणि दुपट्टा घातला आहे. तिथे उपस्थित असलेल्यानी कतरिनाच्या या लूकचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यानंतर चाहते कतरिना प्रेग्नंट असल्याचे सांगत आहेत
 
सध्या कतरिना कैफ 'टायगर 3' आणि 'मेरी ख्रिसमस'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटांच्या शूटिंगवरून परतताना कतरिना स्पॉट झाली होती. कतरिनाच्या कपाळावर लाल मोठी बिंदी आहे आणि ती गुलाबी ड्रेस आणि फ्लेट बेली मध्ये आरामात आणि हळुवार चालताना दिसली. कतरिना दिसायला खूप सुंदर आहे पण कॅटरिनाच्या ड्रेस अप आणि चालण्याच्या स्टाइलमुळे कैफ प्रेग्नंट असल्याचं चाहत्यांना वाटतंय.

फोटोग्राफर विरल भयानी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओ वर युजर्स प्रतिक्रिया देत आहे. एका यूजरने लिहिले की अरे देवा, ती प्रेग्नंट दिसतेय. आणखी एकाने लिहिले, लवकरच कतरिना होणार आहे आई!