मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 एप्रिल 2023 (12:48 IST)

यश चोप्रा यांची पत्नी आणि राणी मुखर्जीच्या सासू पामेला यांचे निधन

Yash Chopra's wife Pamela Chopra passes away at 85
Pamela Chopra Death मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची पत्नी आणि राणी मुखर्जीची सासू पामेला चोप्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.
 
पामेला चोप्राने अनेक YRF चित्रपटांमध्ये लेखक, कॉस्च्युम डिझायनर आणि सह-निर्माता म्हणूनही काम केले. नुकतीच पामेला यश चोप्रा यांच्या जीवनावर आधारित 'द रोमॅंटिक्स' या डॉक्यूमेंट्री दिसल्या होत्या. यात त्यांनी पती यश चापोडा यांच्या प्रवासाबद्दल सांगितले.
 
पामेला चोप्रा ही आदित्य आणि उदय चोप्रा यांची आई होती. पामेलाचे पती यश चोप्रा यांचे 11 वर्षांपूर्वी निधन झाले. पामेलाच्या मृत्यूवर कुटुंबाकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.