बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कंगना साकारणार राणी लक्ष्मीबाई

‘राणी लक्ष्मीबाई’ हा झाशीच्या राणीच्या जीवनावरील चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलावंत आणि तंत्रज्ञानासह दिग्दर्शक केतन मेहता बनवत असून कंगना राणावत यात झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारणार आहे.
 
कंगना आपल्या या भूमिकेबद्दल म्हणते, माझे पूर्ण लक्ष मी ा चित्रपटावरच केंद्रित केले असून झाशीच्या राणीच्या भूमिकेला न्याय देता यावा म्हणून मी या व्यतिरिक्त कुठलाही चित्रपट स्वीकारलेला नाही. चित्रपटातील राणी लक्ष्मीबाईची भूमिका करण्यासाठी कंगना राणावत घोडेस्वारी, तलवार चालवणे याचे प्रशिक्षण घेत आहे. प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढताना राणी लक्ष्मीबाईंनी तोंडात घोडय़ाचा लगाम पकडून दोन्ही हातांनी तलवार चालवली होती. कंगनाही या युद्धाचा कसून सराव करत आहे.
 
तोंडात घोडय़ाचा लगाम धरून दोन्ही हातांनी तलवार चालवायला शिकवण्यासाठी खास प्रशिक्षक नेमले आहेत. नऊवारी साडी नेसून घोडय़ावर बसणे, पाठीला मूल बांधणे अशी सगळी तयारी कंगना करत आहे. राणी लक्ष्मीबाईंवरच्या चित्रपटातील प्रत्येक दृश्य खरे वाटावे यासाठी कंगना प्रत्येक दृश्य चित्रित होण्यापूर्वी खूप तालीम करते. राणी लक्ष्मीबाईबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल जेव्हा मी वाचले तेव्हा मला कळले, तात्या टोपे आणि नानासाहेबांएवढय़ाच त्याही शूर होत्या.