गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2016 (09:46 IST)

डिप्रेशनग्रस्तांना आधार देणार दीपिका!

बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण एकेकाळी डिप्रेशनमध्ये होती. त्यामुळे ती आता इंडियन सायकॅट्रिक सोसायटीच्या सहकार्याने अशा व्यक्तींना आधार देणार आहे. या सोसायटीची स्थापना 1974 रोजी झाली होती. सध्या ही संस्था दीपिकाच्या बंगळुरुमधील लिव्ह, लव्ह, लाफ फाउंडेशन सोबत काम करते. या दोन्ही संस्था भारतातील मानसिक स्वास्थच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी कार्यक्रम हाती घेणार आहेत. सध्या भारतीयांचे ढासळणारे मानसिक स्वास्थ्य ही देशासमोरची गंभीर समस्या ठरत आहे. या विरोधात जनजागृतीसाठी अधिकाधिक सोर्सची गरज आहे.

दीपिकाच्या मते, इंडियन सायकॅट्रिक सोसायटीची ब्रॅण्ड अम्बॅसिडर झाल्याने आणि या नव्या भूमिकेने अतिशय आनंद झाला आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 5% नागरिक लहान-मोठय़ा मानसिकआजारांनी त्रस्त आहेत. 2 ते 2.5 टक्के नागरिक बायपोलरसारख्या आजारांनी त्रस्त आहेत. एक टक्का स्किटस्फ्रीनिया, तर 15% मेंटल एंजाइटी डिसऑर्डरसारख्या आजारांनी ग्रस्त आहेत.