शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रियांका, जेनिफर लोपेझ एकाच गाण्यात

प्रियांका चोप्राचे स्टारडम हॉलिवूडमध्ये चांगलेच वाढत आहे. ‘क्वॉटिंको’ आणि आगामी ‘बेवॉच’, विविध मासिकांच्या कव्हर पेजसाठीचे शूट यानंतर प्रियांका थेट इन्रिक इग्लिसच्या व्हीडीओ साँगमध्ये झळकली आहे. 
 
या गाण्यात जेनिफर लोपेझ, फुटबॉलपटू क्रिस्टिएनो रोनाल्डो यांचाही समावेश आहे. शुक्रवारी हे गाणे रिलीज झाले असून चारच दिवसात हे गाणे जगभरात व्हायरल झाले आहे. ‘डोन्ट यू नीड समबडी’ असे या अल्बमचे नाव आहे. यात प्रियांका, जेनिफर लोपेझ सोबत कॉन, मिला जोवोविचक, रयान सीक्रेटस्, मेसूट ओझील यांचाही समावेश आहे.
 
प्रियांका या गाण्यात जंपसूटमध्ये असून वाईन कलरची लिपस्टिक खुलून दिसत आहे. प्रियांकाने यापूर्वी ‘इन माय सिटी’ या व्हीडीओत काम केले होते. त्यानंतर अन्य दोन गाण्यांतही प्रियांकाची लीड भूमिका होती. पुढे तिला ‘क्वाँटिको’मध्ये हत्त्वाची भूमिका मिळाली आणि बेवॉचमध्ये ती निगेटिव्ह रोलमध्ये आहे.